श्रमिक विद्यालय वन्यजीव सप्ताह

। खांब-रोहा । वार्ताहर ।

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्रमिक विद्यालय चिल्हे येथे वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. त्या अनुषंगाने श्रमिक विद्यालय चिल्हे व सामाजिक वनीकरण व वन विभाग विभाग, रोहा यांच्या विद्यमाने सदरचा सप्ताह विद्यालयात साजरा करण्यात आला.

यावेळी सामाजिक वनीकरण लोहाचे दिलिप वाघे, सुरेश वाघमारे, दिपक जगताप, नरेंद्र माळी, अनुराधा मोरे, ज्योत्स्ना सबरदंडे आदी उपस्थित होते.

सामाजिक वनीकरणाचे वाघे यांनी वन्यजीव हे पर्यावरण साखळीतील महत्त्वाचे घटक असून त्यांची शिकार न करता त्यांना जीवदान दिले पाहिजे. दिवसेंदिवस वन्यजीवांची संख्या कमी कमी होत चालली असून ही परिस्थिती अशीच राहिली तर पर्यावरणाचा समतोल ढासळला जाईल व त्याचे भविष्यात खुप दुष्परिणाम भोगावे लागतील. यासाठीच वन्यजीवांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या सप्ताहानिमित्त सामाजिक वनीकरण व वन विभाग, रोहा यांच्या वतीने चित्रकला व निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version