अलिबागमध्ये भरणार श्रावण सृजन

महिला नवउद्योजिकांसाठी हक्काचं व्यासपीठ
| अलिबाग | प्रतिनिधी
श्रावण सृजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या विविध हस्तकला व कलाकुसारीच्या वस्तूंचे दोन दिवसांचे प्रदर्शन दि. पाच व सहा ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते रात्री 8 या दरम्यान अलिबाग येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये भरविण्यात येणार आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना तसेच व्यावसायिक म्हणून विकसित होऊ पाहात असलेल्या महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजक आम्ही अलिबागच्या उद्योगिनीफ हा व्हॉट्सअ‍ॅप गू्रप आहे.

गृहसजावटीच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पर्सेस, दागदागिने, फोटोफ्रेम, मेणबत्त्या, हस्तकलेच्या वस्तू तसेच आगामी काळात येणार्‍या रक्षाबंधन, गणेशोत्सव आदी सणांच्या पार्श्‍वभूमीवर विविध उपयुक्त वस्तूंचा समावेश या प्रदर्शनात करण्यात येणार आहे. प्रत्येक महिलेला किंवा त्यांच्या गू्रपला या ठिकाणी स्टॉल देण्यात येणार असून, त्याची नोंदणी आधी करावी लागणार आहे. प्रत्येक उद्योजक महिलेला आपला माल याठिकाणी विकता येणार असून, त्यामाध्यमातून व्यवसाय विस्तारण्यास नक्कीच वाव मिळेल, अशी खात्री आम्ही अलिबाग उद्योगिनी या गु्रपला आहे.

आम्ही अलिबागच्या उद्योगिनीफ हे महिला उद्योजकांना एकत्र आणणारं एक हक्काचं व्यासपीठ. या ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत अलिबाग तालुक्यातील जवळपास 350 हून अधिक महिला उद्योजिकांना एकत्र आणण्यात यश आले असून, त्याचा त्यांना आपल्या व्यवसायासाठी फायदा झाला आहे. या गू्रपचे हे पहिलेच वर्ष असून, सुरुवात होऊन तीनच महिने झाले आहेत. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी ज्योत्स्ना चौगुले 9637861680 आणि आशा बोराडे 7718890262 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महिलांच्या या उद्योगशीलतेला माझे नेहमीच सहकार्य असेल. या माध्यमातून महिलांना खर्‍या अर्थाने व्यवसायाचा आत्मविश्‍वास येईल, असा मला विश्‍वास वाटतो. उद्योजक महिलाफ घडविण्याची आम्ही अलिबागच्या उद्योगिनीफ ही नांदी ठरो. – चित्रलेखा पाटील, शेकाप, महिला आघाडी प्रमुख

Exit mobile version