| महाड | प्रतिनिधी |
राज्यातील विद्यार्थी व कलाकारांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या प्रतिभाशक्तीला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे याकरिता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक उपक्रम आयोजित करते. कला संचालनालयामार्फत महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन 29 डिसेंबर 2025 ते 6 जानेवारी 2026 आयोजित करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यादरम्यान सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी तथा भेलोशी गावचा गुणवंत कलाचित्रकार श्रणव संतोष यादव यांनी कला क्षेत्रात सहभागी होऊन भावूक (इमोशनल) वस्तूचित्र (इनसेट) अशा दोन विषयावरील चित्र रेखाटले होते. त्यांचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला. यामध्ये श्रणव यादव यशस्वी झाला असून त्यांचे सत्कार व पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. श्रवण यादवांनी दिलेल्या त्यांच्या सामाजिक विषयांच्या चित्रांना पंचांनी दाद देत त्यांच्या या यशस्वी कामगिरीबाबत दि. 6 फेब्रुवारी सांगली येथील विश्वविद्यालय शाळेत पारितोषिक वितरण करण्यात आल्याचे ऑनलाईन निकालामध्ये सांगण्यात आले आहे. श्रणवच्या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.







