नाथभैरव झाप संघ विजयी
| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
सुधागड तालुका कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने श्री वाघेश्वर क्रीडा मंडळ आंबिवली यांच्या वंतीने तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत तालुक्यातील नामवंत 16 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतिम लढत नाथभैरव झाप विरुद्ध वरदायिनी राबगाव या दोन संघात झाली. मात्र या स्पर्धेत झाप हा संघ विजयी होऊन अंतिम विजयी होण्याचा मान पटकावला. या संघास रोख रक्कम 11 हजार 111 रु व आकर्षक चषक, तर उपविजेता पदाचा मानकरी वरदायिनी राबगाव हा संघ ठरला. या संघास रोख रक्कम 7 हजार 777 रु व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक भैरिनाथ नागशेत संघास रोख रक्कम 5 हजार 555 रु व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक जय हनुमान म जांभूळपाडा या संघास रोख रक्कम 5 हजार 555 रु व आकर्षक चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रेम कुडपाने (झाप), उत्कृष्ट चढाई मयुरेश पोंगडे (नागशेत), उत्कृष्ट पक्कड राज भोईर (राबगाव), पब्लिक हिरो ज्ञानेश्वर साजेकर (म जांभूळपाडा) या खेळाडूंना आकर्षक पदक देऊन गौरविण्यात आले.