| पेण | प्रतिनिधी |
राजेश मोकल या इसमाने वडखळ ग्रामपंचायतीचा विकासाचा बट्ट्याबाळ केला असल्याने श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडी वडखळची स्थापना केली आहे. आमच्यातील काही जणांनी यापूर्वी राजेश मोकल यांना निवडुन आणण्यासाठी मदत केली होती. परंतु, गेल्या पाच वर्षात राजेश मोकल यांच्या रुपाने वडखळ ग्रामपंचायतीला लाभलेला सरपंच म्हणजे फक्त भ्रष्टाचार-भ्रष्टाचार-भ्रष्टाचारच असे प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी सरपंच तथा उमेदवार योगेश पाटील यांनी आरोप केला.
योगेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्ही राजेश मोकल यांच्या अनेक अवैध कामांना विरोध केला. तसेच वेळोवेळी ठराव केले परंतु असे असताना देखील अनेक कामांमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला. इंद्रनगर येथे लाखो रुपये खर्च करुन बंधारा बांधला पाणलोट समितीच्या अध्यक्षा कोण आहेत.त्या बंधाऱ्याचा एक थेंब ही उपयोग गावकऱ्यांना झाला नाही. आज सी. एस. आर. फंडातून बांधलेल्या मच्छिमार्केटची अवस्था काय आहे. मच्छिमार्केट कोणी बांधले. निशीगंधा इंटरप्राझेसच्या मालक पुजा मोकल या आता उमेदवार आहेत. या राजेश मोकल यांच्या सुविद्य पत्नी आहेत. \
आठवडा बाजारासाठी जे गाळे बांधले आहेत. त्या गाळयांसाठी केलेला 25 लाख खर्च आणि गाळयांची अवस्था यावरुन लक्षात येईल असे आपले म्हणणे योगेश पाटील यांनी मांडले. निलेश म्हात्रे यांनी सांगितले की, माता सरस्वतीचे ज्या ठिकाणी वास्तव्य असते,अशा शाळेची अवस्था आज काय आहे. 2021 पासून काम सुरु झाले असून आजतागायत शाळेचे काम पूर्ण झालेलं नाही. ज्या खोल्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्या खोल्यांमध्ये गळती सुरु आहे. वडखळ शाळेत 165 विद्यार्थी आहेत. खोल्यांअभावी कोंडवाड्याप्रमाणे विद्यार्थ्यांना दोन खोल्यांमध्ये बसावे लागते. त्या खोल्यांमध्ये विजेची व्यवस्था देखील योग्यप्रकारे नाही. याचे काम देखील निशीगंधा इंटरप्रायझेस करत आहे. नैसर्गिकरित्या सुर्य प्रकाशाच्या सहाय्याने शुध्द होणारे पाणी बंद झाले.आज त्या विहिरीतील पाणी प्रदुषित होऊ न वापरण्यायोग्य राहिलेले नाही. त्याच्या बाजूने गटारगंगा झाली आहे. असे शेवटी निलेश म्हात्रे व योगेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.