। माणगाव । प्रतिनिधी ।
स्वच्छता हि सेवा हा उद्देश नजरेसमोर ठेऊन महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान अंतर्गत डॉ.श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव तालुक्यातील श्री सदस्यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाची स्वच्छता केली.
स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत स्वच्छता पंधरवडा राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता हि सेवा अंतर्गत उपक्रमाच्या अनुषंगाने माणगाव तालुक्यातील 535 श्री सदस्यांनी एकत्रित येत माणगाव शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची स्वच्छता केली. यावेळी श्री सदस्यांनी रुग्णालय परिसरातून 15 टन इतका सुका कचरा गोळा करून हा कचरा 5 ट्रॅक्टर लावून उचलण्यात आला. श्री सदस्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमावेळी माणगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी वैध्यकीय अधीक्षक डॉ.अरुणा पोहरे, परिचारिका शिवकांता गवळी आदी उपस्थित होते.