| उरण । वार्ताहर ।
चिरनेर गावात श्री राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 125 वर्षांची परंपरा जपणार्या मधिलपाडा-तेलीपाडा ग्रामस्थांच्यावतीने राजा खारपाटील या दांपत्याच्या हस्ते अभिषेक सोहळा विधीपूर्वक पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.यानिमित्त अभिषेक, हरिपाठ,भजन कीर्तन प्रवचन,पालखी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किर्तनकार प्रकाश कुंडे वहाळ यांचे श्री रामचंद्रांच्या जन्मावर सुश्राव्य किर्तन पार पडला.यावेळी महेंद्र घरत, संतोष ठाकूर, शुभांगी पाटील यांच्या सह विविध पक्षांच्या नेत्यांनी श्री रामाचे दर्शन घेतले.