मुरुडमध्ये श्रीरामजन्मोत्सव साजरा

| आगरदांडा | वार्ताहर |
मुरूड तालुक्यातील एकदरा ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम मंदिरात 59 वा श्रीरामजन्मोउत्सव उत्सवात साजरा करण्यात आला. येथील श्रीराम मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.अनेकांनी पूजा, प्रार्थना करत श्रीरामचे उत्सवानिमित्त दर्शन घेतले.
मंदिर परिसरात विद्युतरोषणाई करण्यात आली होती. सरपंच रामकृष्ण आगरकर यांच्या हस्ते श्रीरामाची चांदीची मुर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर श्रीरामला पाळण्यात घालुन अंगाई गीत गाण्यात आले. महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. माणगाव येथील ह.भ.प.परशुराम उपाध्ये यांनी किर्तनात श्रीराम जन्मोत्सव गाऊन सर्वांना मोहीत केले. मुरूड तालुक्यातील पंचक्रोशीत भागातील असंख्य श्रीराम भक्त हजर होते. धनुर्धारी महादेव कोळी समाज एकदरा- महिला मंडळ व मुंबई मंडळाच्या वतीने हा उत्सव साजरा करण्या करिता मेहनत घेतली.

Exit mobile version