। अलिबाग । वार्ताहर ।
श्री समर्थ कृपा वृद्धधाम परहूरपाडा अलिबाग येथे तहसीलदार मिनल दळवी यांच्या उपस्थितित सर्व वृद्धांचे 100 टक्के लसीकरण करण्यात आले. त्याच बरोबर आधारकार्ड रजिस्टेशन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. वृद्धाश्रमाचे संचालक ड जयेंद्र गुंजाळ यांच्या कार्यचा गौरव तहसीलदार मिनल दळवी यांनी केला. तेथील व्यवस्था आणी नियोजन वृद्ध पुरुष महिला सांगोपन पाहून तहसीदार तसेच यांनी कौतुक केले.
यावेळी शिवजयंती वृद्धधाम मध्ये मोठ्या उत्सहात साजरी केली. तहसीलदार मीनल दळवी यांच्या मार्फत वृद्धधाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो प्रेम आनावरण करण्यात आले. यावेळी अॅड.गुंजाळ यांच्या पत्नी, तलाठी गायकवाड, आधार केंद्र, आभा झेरॉक्सचे अशोक वारगे, आरोग्य अधिकारी वर्ग, इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली परहूर येथील श्री समर्थ वृद्धाश्रम येथील निराधार वृद्ध बांधवांसाठी आधारकार्ड नोंदणी, आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये 21 वंचित निराधार वृद्धांची आधारकार्ड नोंदणी करण्यात येऊन एकूण 36 वृद्धांचे लसीकरण पहिला डोस व आरोग्य तपासणी केली.