एकता ग्रामीण क्रिकेट स्पर्धेत श्री सोमजाई मांगवली संघ विजयी

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव एकता ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या सौजन्याने श्री सोमजाई क्रिकेट क्लब मांगवली संघाने आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत यजमान श्री सोमजाई क्रिकेट क्लब मांगवली संघाने अंतिम सामन्यात दोस्ती क्रिकेट क्लब निळगुण संघावर मात करीत प्रथम क्रमांकचे रोख पारितोषिक 10 हजार रुपये व आकर्षक चषक पटकावला. सदर स्पर्धेत असोसिएशनचे 16 संघ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. माणगाव तालुक्यातील लहाने सुरव येथील मैदानावर आयोजक श्री सोमजाई क्रिकेट क्लब मांगवली यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे विजेते दोस्ती क्रिकेट क्लब निळगुण संघास रोख 7 हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचे विजेते आडघरचा छावा संघास रोख 5 हजार रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांकाचे न्यू चॅम्पियन बॉईज तळेगाव संघास रोख 3 हजार रुपये व आकर्षक चषक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट फलंदाज विजय गुगले, उत्कृष्ट गोलंदाज आदेश गुगले तर मालिकावीराचा बहुमान शैलेश पाखुर्डे यांनी पटकावला. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे विवेक जाधव, योगेश भोनकर व योगेश पवार यांनी मराठीतून धावते समालोचन केले.

Exit mobile version