। महाड । प्रतिनिधी ।
महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या शहरातील शिव कालीन अशा श्री विरेश्वर मंदिरातील स्वयंभू शिव पिंडीवर तब्बल 200 किलो तांदूळाची रंगीत रांगोळी काढण्यात आली होती.
सदरची रांगोळी पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी महाड शहर आणि परिसरातील भाविकांनी मंगळवारी रात्री श्री विरेश्वर मंदिरात गर्दी केली होती. यावेळी देवस्थानाकडून भाविकांना मास्क तसेच सॅनेटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत शिस्तीने रांगेत उभे राहून भाविकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत श्री विरेश्वर महाराजांची पूजा तसेच पिंडीवर साकारण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा रांगोळीचे दर्शन घेतले. सदरची आकर्षित रांगोळी ही मंगेश गुरव, अक्षय गुरव, संदीप गुरव, अविनाश टक्के, राजा सकपाळ आदींनी साकारली. सदरची रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.