| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील हातनोली येथील श्रीकांत महादेव देशमुख (50) यांचे गुरुवारी (दि.2) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य, जिल्हा मच्छिमार संघाचे संचालक धनंजय देशमुख यांचे ते धाकटे बंधू तसेच शेकाप रायगड चिटणीस मंडळाचे सदस्य ॲड.परेश देशमुख यांचे ते चुलत भाऊ होतं.
श्रीकांत देशमुख हे सामाजिक व इतर क्षेत्रात सक्रीय होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते. पाटबंधारे विभागात ते कार्यरत होते. गुरुवारी (दि.2) पहाटे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हातनोली येथील स्मशानभूमीमध्ये दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खालापूर तालुक्यातील मराठी समाजाचे नेते मंडळी, किशोर पाटील, संतोष जंगम, भूषण कडव, प्रवीण लाले, जयवंत पाटील, सुधीर ठोंबरे, मोतीराम ठोंबरे, नवी मुंबई महानगर पालिकेतील कर्मचारी, राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, शेकाप पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक, मित्र मंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी श्रीकांत देशमुख यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
श्रीकांत देशमुख यांचे निधन
