श्रीवर्धन-म्हसळा तापले!

। कापोली । वार्ताहर ।

श्रीवर्धन-म्हसळा तालुक्यातील नागरिक सुर्य आग ओकत असल्याने अक्षरशः उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. अंगाची लाहीलाही होत आहे. ऐन उन्हाळ्यातही कधी उष्ण, तर कधी दमट वातावरण निर्माण होत आहे. मध्येच अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचा प्रचंड नुकसान होत असतो. नागरिकांच्या आरोग्यासाठी ते धोकादायक आहे. वाढत्या उष्णतेमुळे काम धंद्याच्या शोधात लोकं घराबाहेर पडताना काळजी घेत आहेत. अश्यातच कोकणातील जे शेतकरी शेतात भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत, त्यांना उन्हाचा प्रचंड त्रास होऊ लागला आहे. अक्षरशः त्यांचे शरीर शेतात गारवा असुनही भाजून निघत आहे. शितपेयाची ठिकाणे गजबजून गेली आहेत. बॉटलमधील पाण्याची मागणी वाढू लागली आहे. शरीराला गारवा मिळावा म्हणून नारळ पाणी, उसाचे रस, लिंबू सरबत, कोकम सरबत रस्त्यात जिथे दुकान असतील तिथे थांबून गर्दी करु लागले आहेत.

Exit mobile version