श्रीवर्धनमध्ये पांढर्‍या गरुडाला जीवदान

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
येथे पर्यावरण मित्र यांच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ अशा विदेशी प्रजातीमधील पांढर्‍या गरुडाला जीवदान मिळाले आहे. यामुळे सचिन शिंदे, शैलेश ठाकूर तथा सिस्केप संघटनेचे सदस्य बाळा वाणी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सवयीप्रमाणे पर्यावरण मित्र सचिन शिेंदे हे त्यांचे मित्र शैलेश ठाकूर यांच्या नारळी-सुपारीच्या वाडीत फेरफटका मारण्यास निघाले असता, तिथे मुळ विदेशी प्रजातीतील, दुर्मिळ स्वरुपातील पांढर्‍या गरुडाचे पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले.
विदेशी गरूड हे हवा बदलासाठी कोकण परिसरात दरवर्षी येत असतात. मोठा गरूड असेल तर कावळे व इतर पक्षी त्यांच्या वाटेला जात नाही. परंतु,लहान गरुड असेल तर कावळे व इतर पक्षी चोचा मारुन त्याला घायाळ करत असल्याची माहिती बाळा वाणी यांनी दिली आहे.
यानुसार अन्य पशूपक्ष्यांकडून या पक्षाला घायाळ करण्यात आले असल्याने, ते मरणन्मुख अवस्थेकडे पोहचले होते. या पक्षावर प्रथमोपचार करत पर्यावरणमित्र शैलेश ठाकूर, सचिन शिंदे यांनी सिस्केप संघटनेचे सदस्य बाळा वाणी यांच्या मदतीने श्रीवर्धन येथील वनविभागाकडे स्वाधीन केले.

Exit mobile version