यूपीएससी परीक्षेत श्रुती शर्मा अव्वल

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा-2021 चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. त्यात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. श्रुती शर्मा ही देशातून पहिली आली आहे. अंकिता अग्रवाल, गामिनी सिंगला यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या तिन्ही जागांवर मुलींनी मारलेली बाजी यंदाच्या निकालाचे खास वैशिष्ट्य आहे. टॉप 10 मध्ये 4 मुलींचा समावेश आहे. परीक्षार्थींना आपला निकाल र्ीिील.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर पाहता येईल. अव्वल स्थान पटकावलेली श्रुती शर्मा सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अफ आणि गट ब मध्ये सेवेची संधी मिळणार आहे.

Exit mobile version