| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
श्रीमती शुभदा शशिकांत मोहिते यांचे वृद्धापकाळाने दिनांक ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी निधन झाले. त्या ७६ वर्षे वयाच्या होत्या त्यांच्यामागे पती, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शुभदा शशिकांत मोहिते या कोंकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून अनेक वर्षे सेवेत होत्या.
कन्याशाळा-अलिबाग, हया शाळेच्या – मुख्याध्यापिका म्हणून त्या निवृत्त झाल्या. सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शशिकांत मोहिते यांच्या त्या पत्नी होत. कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या त्या सक्रीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी अनेक वर्षे कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाच्या वधु वर सूचक मंडळाचे काम पाहिले. या काळात त्यांनी अनेकांचे संसार जुळवले. त्यासाठी त्यांनी स्वतःसाठी कसलीच फि देखील घेतली नाही. त्यांच्यावर श्रीबाग येथील स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.
यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कित्ते भंडारी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष बळवंत शिर्सेकर, विश्वस्त तोडणकर गुरुजी, उपाध्यक्ष कमलाकर पडवळ, मधुकर पारकर, सनदी लेखापाल संजय राऊत, सदस्य संतोष मोरे, राजेंद्र बांदिवडेकर, दत्तदास मयेकर, तुकाराम शिलधनकर प्रवीण घरत, विक्रम शेट आदी उपस्थित होते. यावेळी तोडणकर गुरुजी यांनी मनोगत व्यक्त करीत शुभदा मोहिते यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्रीबाग स्मशानभूमी येथे होणार असल्याची माहिती मोहिते कुटुंबीयांनी दिली