शुभदा वर्तक यांचे निधन

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागाव-खारगल्ली येथील रहिवासी शुभदा श्रीधर वर्तक यांचे रविवारी (दि.16) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी त्या 72 वर्षांच्या होत्या. मरिन फ्रंटरिअर्सचे कर्मचारी मनिष वर्तक यांच्या त्या आई. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पुतणे, जाऊ असा परिवार आहे. शुभदा वर्तक यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या अंत्ययात्रेस पंचक्रोशितील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या पार्थिवावर नागाव-खारगल्ली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, 25 ऑक्टोबर रोजी वंखनाथ मंदिर येथे, तर उत्तरकार्य विधी शुक्रवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

Exit mobile version