शुभमन गिल परतणार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था ।

शुभमन गिल सध्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. प्लेटलेट कमी झाल्यामुळे त्याला नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता तो लवकरच पुनरागमन करू शकतो, असे मानले जात आहे. गिल अहमदाबादमध्ये भारतीय संघात सामील होणार आहे. अशा परिस्थितीत तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. पण गिलसमोर मोठे आव्हान असेल ते मॅच फिट होण्याचे. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो खेळण्याची शक्यता कायम आहे. यावेळी त्याच्याजागी बदली खेळाडू शोधण्याचा किंवा चर्चा करण्याचा कोणताही विचार नाही, कारण व्यवस्थापन त्याला संघामधील एक महत्त्वाचा सदस्य मानत आहे. गिल आधीच सकारात्मक चिन्हे दाखवत आहे आणि लवकरच तो पुनरागमन करेल.

Exit mobile version