संदीप देसाई यांना पत्नी शोक

। पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह तथा राष्ट्रीय कबड्डी पंच संदीप देसाई यांच्या पत्नी श्‍वेता देसाई यांचे नुकतेच निधन झाले. त्या 47 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात पती, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. रासळ येथील स्मशाभूमीत त्यांच्या पार्थदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्‍वेता देसाई यांच्या अकस्मात मृत्यूमुळे देसाई-खाडे कुटुंबीयांसह रासळ गावावर शोककळा पसरली आहे. त्यांचे उत्तरकार्य शुक्रवारी (दि.12) राहते घरी रासळ येथे होणार आहेत.

Exit mobile version