भावंडांकडून बहिणीचा विश्‍वासघात करून जमीन हडपली

| पोलादपूर | प्रतिनिधी |

पळचिल भोगाव दरम्यानच्या गोलदरा येथे राहणार्‍या बहिणीचा वारस दाखला महाड न्यायालयामधून प्राप्त करून भुसंपादन कामात लबाडीने वापरून मिळालेला मोबदला लाटल्याप्रकरणी महाड न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात आल्याची माहिती अन्यायग्रस्त बहिणीने दिली आहे.

भोगाव येथील स.नं. 51-21(5) या मिळकतीच्या भुसंपादनाची रक्कम 54 लाख 62 हजार 399 रूपये भुसंपादन लाटण्याकामी बाळाराम महादेव कदम (रा. परेल, मुंबई), वामन महादेव कदम (सीवूडस दारावे, नवी मुंबई), शारदा अशोक कदम (परेल, मुंबई), हर्षद अशोक कदम (परेल, मुंबई), कृष्णा महादेव कदम (डोंबिवली पश्‍चिम, कल्याण), सुनील मधुकर कदम (डोंबिवली पूर्व, ठाणे) व सीता मधुकर कदम (डोंबिवली पूर्व, ठाणे) आदींनी महाड न्यायालयामध्ये किरकोळ अर्ज क्र.66-2017 दि. 26-10-2017 रोजी करून, केवळ अर्जदारच कै. महादेव आणि कै. विठोबा यांचे वारस आहेत असा अर्ज करून तशी प्रतिज्ञापत्रे केली.

यावेळी हिराबाई राजाराम जाधव (रा. गोलदरा, ता.पोलादपूर) या वारसनोंद फेरफार क्रमांक 50 दि.21-12-1998 ने भोगाव येथील मिळकतीना महादेव कदम यांची मुलगी म्हणून वारस लागलेली आहे याबाबत कल्पना असूनही या खोटया वारस दाखल्याचा वापर लबाडीने करून हिराबाई राजाराम यांचे हक्क डावलून स्वत:चा फायदा करून घेतला. न्यायालयामध्ये खोटी माहिती दिली, वस्तुस्थिती लपविली, असल्य विधाने केली, खोटया माहितीच्या आधारे वारस दाखला प्राप्त केला. न्यायदानाच्या पवित्र कामात खोटेपणा केला आहे. हिराबाई राजाराम जाधव यादेखील वारस असूनही त्यांचे नांव आर्थिक लाभापोटी वगळले आणि प्राप्त केलेला वारस दाखला खोटा असल्याची पूर्ण जाणीव त्या दाखल्याचा वापर तो खरा आहे असा भुसंपादन अधिकार्‍याकडे करून बाळाराम कदम, वामन कदम, शारदा कदम, हर्षद कदम, कृष्णा कदम, सुनील कदम व सीता कदम आदींनी भादंवि 191, 192, 196, 198, 200, 209, 420, 464, 468, 471 कलमान्वये गुन्हा केला असल्याचा खटला ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. राजेश जोशी यांच्यामार्फत सीआरपीसी कलम प्रमाणे दाखल केला आहे.

Exit mobile version