नेरळमध्ये सिद्धगड बलिदान दिन साजरा

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्टच्या माध्यमातून हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचा बलिदान दिवस तिथीप्रमाणे साजरा केला जातो. 2 जानेवारी 1943 रोजी भाई कोतवाल यांच्या दस्त्यावर मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे ब्रिटिश पोलिसांनी पहाटे सहा वाजता केलेल्या गोळीबारात सहा वाजून दहा मिनिटांनी भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. त्या दिवशी मार्गशीष महिन्यातील एकादशी होती आणि त्यामुळे स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ भडसावळे यांनी नेरळ येथे 50 एकर जमीन खरेदी केली आणि स्वातंत्र्यपूर्व काळात तेथे स्थापना केली. त्यावेळपासून कोतवालवाडी मध्ये सिद्धगड बलिदानदिन तिथीप्रमाणे साजरा केला जातो.


भल्या पहाटे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी नेरळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी नेरळ विद्या मंदिर, नेरळ विद्या विकास आणि कोतवाल वाडी ट्रस्ट मधील माजी विद्यार्थ्यांनी समुहगीत सादर करून गीतांमधून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी वांगणी रेल्वे स्थानकात मुलीचे प्राण वाचविण्यारा मयूर शेळके यांच्या हस्ते भल्या पहाटे म्हणजे सहा वाजून दहा मिनिटांनी कोतवालवाडीमध्ये क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यावेळी कोतवाल वाडी ट्रस्टच्या व्यवस्थापकीय संचालक आणि रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य अनसूया पादीर, नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंच उषा पारधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version