परसबाग स्पर्धेत सिद्धेश्‍वर शाळा द्वितीय

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात सुधागड तालुक्यातील शाळा सिद्धेश्‍वर यांनी सेंद्रिय खताचा वापर करून विषमुक्त परसबाग तयार केली. यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, शिराळी, घेवडा, पालक यांचे उत्पादन घेऊन त्याचा शालेय पोषण आहारात पौष्टिक भाज्यांचा वापर केला. त्याचबरोबर आंबा, काजू, फणस, आवळा, केळी, शेवगा, पेरू या उपयुक्त झाडांची लागवड केली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, श्रमप्रतिष्ठा, नमनिर्मिती आनंद, पर्यावरण रक्षण व संवर्धन, स्वच्छता, भूतदया या मूल्यांची जोपासना झाली.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका रोहिणी खामकर, निसर्गप्रेमी शिक्षक जनार्दन भिलारे, माधवी गुरव, रूपा पांपटवार, स्वप्नाली मेमाणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र यादव व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. परसबाग स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त होऊन 2000 रुपयाचे पारितोषिक मिळाले आहे. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी प्राथमिक पुनिता गुरव, जिल्हा समन्वयक गजभिये, गटविकास अधिकारी लता मोहिते, गट शिक्षणाधिकारी सादुराम बांगारे, केंद्रप्रमुख कैलास म्हात्रे यांनी विशेष अभिनंदन केले.

Exit mobile version