मुरुड-आगरदांडा रस्त्यावरील साईडपट्टी धोकादायक

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड-आगरदांडा रस्त्यावर शेगवाडा ते वसंतराव नाईक महाविद्यालय रस्त्या दरम्यान डांबरीकरण करण्यात येत असून या रस्त्यालगत साईडपट्टी भरण्यात न आल्याने, खड्डा तयार झाल्याने वाहनचालकांची डोकेदुखी ठरत असून वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन याठिकाणी साईडपट्टी तातडीने बुजविण्याची मागणी जोर धरत आहे.

साळाव-मुरुड-आगरदांडा रस्त्याचे डांबरीकरण कामाला जोमाने सुरुवात झाली असून मुरुड-आगरदांडा रस्त्यावर शेगवाडा ते वसंतराव नाईक महाविद्यालय दरम्यान डांबरीकरण करण्यात आले असून या ठिकाणी साईडपट्टीला जवळपास एक फुटाचा खड्डा तयार झाल्याने वेळप्रसंगी या ठिकाणी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी यात लक्ष पुरवून येथील रस्त्यालगतची साईडपट्टी तातडीने पूर्ण बुजविण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी याठिकाणी रस्त्यावरील साईडपट्टी लवकरात लवकर बुजविण्यात येतील. असे सुत्रांकडून सांगण्यात आले.

Exit mobile version