कार्यकर्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडकणार
। पेण । वार्ताहर ।
शेतकरी कामगार पक्ष खारेपाट पाणी योजनेसाठी आक्रमक झाले दि.23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला हजारोंच्या संख्येने घेराव आंदोलन करणार आहेत.
पेण खारेपाटासाठी 2016 ला हजारो कार्यकर्ते चार दिवस चालून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आ.धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली 29 कोटी 38 लाखाची निधी मंजुर करुन घेतला. त्यानंतर मार्च 2019 ला पुर्ण होणारी खारेपाटाची पाणी योजना आजतागयत पुर्ण झाली नाही. खारेपाटातील जानतेसह पेण विधानसभा मतदार संघातील मुख्यमंत्र्यांच्या घरावर पायी चालत जाऊन आणलेल्या निधीचा योग्य वापर होत नसल्याने जाब विचारण्यासाठी आ.धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय पेण याला घेराव देऊन धरणे आंदोलन करणार आहेत.
खारेपाटातील पाणी योजनेचे काम संथ गतीने का सुरु आहे. तसेच काम पुर्ण होण्याची डेडलाईन निश्चित सांगितली जात नाही. याचे उत्तर एका सक्षम व जबाबदार अधिकार्यांच्या माध्यमातुन जो पर्यंत मिळत नाही, तो पर्यंत धरणे आंदोलन सुरुच राहणार आहे. सकाळी 11 वाजता शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपअभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय वाशी नाका येथे आ.धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली जमा होऊन आंदोलनाला सुरुवात करणार आहेत.