| पनवेल | वार्ताहर |
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषणामुळे डोळे चुरचुरणे, अस्थमा, दमा अशा आजाराने नागरिक त्रस्त असून यावर प्रशासनाने कार्यवाही करावी, या मागणीसाठी रोडपाली सिटीझन फोरमच्या वतीने खारघरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. वाढत्या प्रदूषणामुळे खारवर, रोडपाली, तळोजा, कळंबोली आदी भागात लहान मुले, गर्भवती, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून फुफ्फुसाचा श्वासोच्छवासाच्या कर्करोग, समस्या, त्वचेच्या समस्या उद्भवत आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीतील वायू प्रदूषणापासून आम्हाला वाचवा, अशी आर्त मागणी रहिवाशांनी केली आहे.