। गडब । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील गडब येथील संस्कार शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सव गडब येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी सामजिक कार्यकर्ते तथा आर्किटेक्ट अतुल म्हात्रे, माजी जिल्हापरिषद सदस्य संजय जांभळे, संस्थेचे अध्यक्ष, संजय चवरकर, माजी मुख्याध्यापक के.पी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक चितामंन मोकल, डोलवीचे उपसरपंच रोहन म्हात्रे, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख हिराजी चोगले, प्रथमेश मोकल, विश्वनाथ पाटील, पी. वाय. पाटील, संदिप म्हात्रे, महेंद्र पाटील, दिनेश म्हात्रे, महेंद्र ठाकुर, अजित कोठेकर, प्रभावती मोकल, गणेश तांडेल, रांजेद्र शेलार आदि मान्यवरांसह संस्थेचे आजी माजी विद्यार्थी पालक नागरीक उपस्थित होते.
संस्कार शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या गडब संस्कार विद्यालयात सत्यनारायणांची महापुजा, महेंद्र पाटील कळवे यांचे भजन, मान्यवरांचा सन्मान माजी विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान, स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. ढोलकीच्या तालावर विजेती नेहा पाटील यांचे नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम शालेय विद्यार्थी नृत्य, माजी विद्यार्थाचे नृत्य, आदिवासी मुलींचे नृत्य , शालेय पालकांचे नृत्य, निमंत्रित समुह नृत्य आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.