| पनवेल | प्रतिनिधी |
आगामी सण उत्सव गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, हनुमान जयंती तसेच नागपूर येथे घडलेल्या अप्रिय घटनेच्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरे गाव, मार्केट परिसर या गर्दीच्या ठिकाणी दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली.
वपोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर दंगा काबू योजना रंगीत तालीममध्ये पोनि गुन्हे सह 03 सपोनि, 22 पोलीस अंमलदार, बीट मार्शल क्रमांक 5 वरील 2 अंमलदार, निर्भया मोबाईल, पनवेल तालुका 1 मोबाईल, पीटर मोबाईल (डायल 112) यांच्यासह पनवेल महानगरपालिका अग्निशामक विभागाकडील अग्निशामक वाहन सह 01 अधिकारी आणि 06 कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालय, पनवेल कडील 01 रुग्णवाहिका सह एक डॉक्टर व दोन कर्मचारी असे उपस्थित होते.