| कोर्लई | वार्ताहर |
मुंबई शहर पॉवर लिफ्टिंग असोसिएशन आणि द मस्कल आर्ट फिटनेस जिम यांच्या संयुक्तविद्यमाने कुर्ला (पश्चिम) कामिनी इंदिरा नगर येथील मस्कल आर्ट फिटनेस सुंदर बाग येथे रविवार (दि.28) आयोजित करण्यात आलेल्या पावर लिफ्टिंग चॅम्पियन शिप-2024 स्पर्धेत मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील वासिम जमीर बकवाल याने बाजी मारत रौप्यपदक मिळविल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
प्रशिक्षक शादिल हलडे यांचे उत्तम प्रकारे मार्गदर्शन लाभले. यास्पर्धेत 285 विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबई शहर पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष महेश पेडमकर, समीर दळवी, विनायक आचरेकर, चाळके मास्टर, प्रविण कदम, जितेंद्र यादव, द मस्कल आर्ट फिटनेस जिमचे पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत बकवाल याला सन्मानित करण्यात आले.