जेथे राघव, तेथे सीता

पती, पत्नीचे एकाचवेळी निधन

| रोहा | प्रतिनिधी |

साता जन्माच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असं म्हटलं जातात. प्रत्यक्षात लग्न करताना शेवटच्या श्‍वासापर्यंत एकमेकांना साथ देण्याचा आणाभाका घेतल्या जातात. काही नाती टिकतात तर काही टिकत नाहीत. पण शेवटच्या श्‍वासापर्यंत आपल्या जोडीदाराला साथ देणारे क्वचितच दिसतात. रोहा तालुक्यात याचा प्रत्यय आला आहे. एका वृद्ध दाम्पत्याने शेवटच्या श्‍वासापर्यंत एकमेकांना साथ दिली आणि एकाच वेळी देह त्यागला आहे.

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी गंगाराम महादू घाडगे (83) निर्मला गंगाराम घाडगे (80) या वृद्ध दाम्पत्याचे निधन झाले आहे. गंगाराम घाडगे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गंगाराम घाडगे यांचे पुतणे राजेश घाडगे हे गावी गेले होते. त्यावेळी राजेश घाडगे यांनी गंगाराम घाडगे यांची विचारपूस केली. राजेश घाडगे यांच्यासोबत बोलत असतानाच गंगाराम घाडगे यांना उचकी लागली आणि त्यांचा मृत्यू झाला. हा सर्व प्रसंग निर्मला घाडगे यांनी पाहिली. पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने त्याही जागीच कोसळल्या. एकाच वेळी दोघांनाही प्राण सोडल्याने घाडगे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यानंतर या दाम्पत्याची गावातून एकत्र अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगाराम घाडगे यांच्यामागे तीन मुले,सुना,नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. गंगाराम घाडगे हे गावात मबंधवाफ या नावाने गावात ओळखले जायचे. गावात सर्वांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागणारे अशीच त्यांची ओळख होती.

Exit mobile version