| कर्जत | वार्ताहर |
कर्जत येथील कृष्णा आंबवणे यांनी बुधवारी (दि.16) खालापूर तालुक्यातील हाळ परिसरात असलेल्या माऊली इंटरप्राईजेस सीएनजी पंपावर गाडीत सीएनजी भरला. त्यांच्या गाडीमध्ये 583 रुपयाचा सीएनजी गॅस भरला गेला आणि त्यांनी ऑनलाईन 5 हजार 583 रुपये भरले होते. पंप मालक श्रीमंत तांदळे यांनी हिशोब केल्यावर 5 हजार रु. जास्त आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून यादरम्यान कोणत्या गाडीत सीएनजी भरला याची पाहणी केली व ट्राफिक पोलीसांच्या मदतीने आंबवणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना उर्वरित रक्कम परत केली.






