सिंधूचे धडाक्यात पुनरागमन

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय महिला बॅडमिंटन संघाने एशियन चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी केली. आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने चीनला 3 – 2 असा पराभवाचा धक्का दिला. दोनवेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूने चार महिन्यानंतर दमदार पुनरागमन करत भारताला सहा वर्षानंतर बाद फेरीत पोहचवण्यात महत्वाची भुमिका बजावली. पीव्ही सिंधू ही दुखापतीमुळे गेले चार महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर होती. एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेद्वारे तिने आंतरराष्ट्रीय स्तारावर जोरदार पुनरागमन केले.तिला गुडघ्याची दुखापत झाली होती. पीव्ही सिंधूने तिच्यापेक्षा चांगली रँकिंग असलेल्या हेन युईचा 40 मिनिटांमध्ये 21 – 17, 21 – 15 असा पराभव केला.

Exit mobile version