। कर्जत । वार्ताहर ।
कर्जतचे चित्रकार पराग बोरसे यांची व्यक्तिचित्रणाची कार्यशाळा नुकतीच सिंगापूरमध्ये पार पडली. ही कार्यशाळा माय आर्ट-स्पेस, ईस्ताना पार्क, सिंगापूर या प्रसिद्ध कलादांनामध्ये आयोजित करण्यात आली होती. दर दिवशी सहा तास असे तीन दिवस ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला भारतीय आणि सिंगापूरकर विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली. कार्यशाळे दरम्यान बोरसे यांनी सॉफ्ट-पेस्टल या माध्यमातून एक व्यक्तिचित्रण पूर्ण करून दाखवले. उपस्थित विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक व्यक्तिचित्रण पूर्ण केले. पिवळ्या रंगाचा फेटा घातलेल्या मेंढपाळाचे हे व्यक्तिचित्र होते.