मोठेभोमच्या रंगभूमीत ‌‘सिंह गर्जला रणी’

ऐतिहासिक नाट्य प्रयोगाचे यशस्वी आयोजन; रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील मोठेभोम येथील श्री हनुमान नाट्य मंडळाच्यावतीने या मदन राजवाडेकर लिखित ऐतिहासिक नाट्य प्रयोगाचे शनिवारी (दि.4) सादरीकरण करण्यात आले. या नाट्य प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद लाभला. त्यामुळे या नाटकाची विशेष चर्चा परिसरातील गावागावात ऐकवयास मिळत आहे.

या नाट्य प्रयोगाचे उद्घाटन राजिपचे सदस्य डॉ. मनीष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रातील स्थानिक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गुरुवर्य वसंत चिर्लेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, दिग्दर्शक विजय केणी, सहदिग्दर्शक सुनील पाटील व चंद्रशेखर पाटील यांनी या नाट्यप्रयोगाची स्थानिक कलाकारांकडून उत्तम अशी तयारी करून घेतली होती. अंगावर शहारे आणणाऱ्या या नाटकातील ऐतिहासिक प्रसंग, लढाईच्या कसरती व ऐतिहासिक संवाद फेकीमुळे कलाकारांनी रंगमंचावर जणू शिवकाळ उभा केल्याचे पाहायला मिळाले. दिग्दर्शकांचे कसब आणि कसलेल्या कलाकारांचा उस्फुर्त अभिनय यामुळे या ऐतिहासिक नाटक कलाकृतीला जिवंतपणा आला होता.

या नाटकात बबन पाटील, अनंत पाटील, संग्राम ठाकूर, विजय केणी, चंद्रशेखर पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अभिजीत पाटील, अशितोष ठाकूर, सर्वेश पाटील, निलेश पाटील, अर्चना पाटील, श्रावणी म्हात्रे, राजेश पाटील, रितेश पाटील, साई ठाकूर, उदय पाटील, अतुल पाटील, संगम नारंगीकर, साई पाटील, कमलाकर पाटील, विवेक पाटील, साहिल केणी, दवेश नारंगीकर आदी जुन्या नव्या कलाकारांनी आपल्या अभिनयाचे रंग उधळले. तसेच, ध्वनी ध्रुवराज म्हात्रे, प्रकाश योजना राजेंद्र जोशी, नेपथ्य चंद्रशेखर पाटील व भगवान पाटील, रंगभूषा नंदकुमार चिरनेरकर, वेशभूषा चंद्रशेखर पाटील, संगीत व पार्श्वगायन गणेश घरत, तबला चैतन्य कडू, पार्श्वसंगीत उमेश गावंड, मोफत जनरेटर व्यवस्था स्मित पॉवर सर्विसेस मोठेभोम, व्हिडिओग्राफी मनोहर फुंडेकर व मनोहर ठाकूर या सर्व तंत्रज्ञानी नाटकातील प्रसंग फुलविले होते.

या नाटकाची निर्मिती व व्यवस्थापन ग्रामस्थ मंडळ मोठेभोम यांची होती. तर, सहनिर्मिती घनश्याम पाटील, समीर नारंगीकर, किशोर केणी, नवनीत नारंगीकर, दिलीप पाटील, बबन पाटील, सचिन घबाडी, भारती सुनील पाटील, श्याम नामदेव पाटील, अनिल जोशी यांची होती. सूत्रधार रोहण पाटील व सदानंद पाटील हे होते. मोठेभोम प्राथमिक शाळेसह साहिल केणी, राजेश पाटील, शरद केणी, निलेश ठाकूर, दत्तात्रेय म्हात्रे यांचे नाट्यप्रयोगास विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले. नाट्यप्रयोग यशस्वी करण्यासाठी मोठेभोम ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version