सामवेदच्या रौप्य महोत्सवा निमित्त ज्येष्ठ सदस्यांचे गायन

| कर्जत | वार्ताहर |

सामवेद संगीत वर्गाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संगीत सभेच्या सोहळ्यात ज्येष्ठ सदस्यांनी विविध गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंदार सोमण संचलित सामवेद संगीत विद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन महिला मंडळ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. मंदार सोमण यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वरदा सोमण, आसावरी काळे, उमा डोंगरे, स्नेहा गोगटे, वैजयंता ठोसर, जोत्सना शिंदे, गणेश ठोसर आदी उपस्थित होते.

पूर्वार्धात यांच्या शिष्या वर्षा जोगळेकर, उमा डोंगरे, सुरेखा पटवर्धन, संध्या भडसावळे, स्नेहल साठे, जयश्री रानडे, विनायक रानडे, आसावरी काळे यांनी शुभारंभी तुला नमितो, माझी देवपूजा, भक्तिवाचून मुक्तीची, नाम हा सुखाचा, जिथे सागरा, रे क्षणाच्या संगतीने, या स्त्री जनमावर, आदी गीते सादर केली. तर उत्तरार्धात जान्हवी ठोसर, स्नेहा गोगटे, स्वाती भोईर, गंधाली दाते, आरंभ गायकवाड, दिव्या दगडे, सायली मळेवाडकर, कांचन कुंटे, कामिनी दांडेकर, प्रसाद जोशी, गौरव दांडेकर, स्वरा सुर्वे आदींनी आकाश पांघरूनी….., थकले रे नंदलाला, मधु मागशी माझ्या, बीज अंकुरे, अंकुरे, अशी पाखरे येती, लग जा गले आदी हिंदी मराठी गीते सादर केली. त्यांना सुराज सोमण यांनी तबल्यावर तर मंदार सोमण यांनी संवादिनीवर साथ संगत दिली. आसावरी काळे व जान्हवी ठोसर यांनी सूत्रसंचालन केले.

Exit mobile version