‘गावात आपत्ती सुरक्षा सूचनांसाठी सायरन बसवावेत’

अलिबाग । वार्ताहर ।
अचानक येणारी नैसर्गिक आपत्ती यांची जिल्हाधिकारी आपत्ती प्राधिकरणाकडून येणारी माहिती त्वरेने ग्रामस्थांना मिळण्यासाठी ग्रामपंचायतने सायरनची आपल्या विभागात यंत्रणा बसवावी ज्यामुळे गावातील नागरिक आपत्तीला सतर्क होऊन काळजी घेतील असे मार्गदर्शन ग्रामपंचायत आक्षीने आयोजित केलेल्या आपत्ती व सुरक्षा मार्गदर्शन शिबिरात जयपाल पाटील,आपत्ती सुरक्षा तज्ञ यांनी सांगितले.

यावेळी सरपंच नंदकिशोर वाळंज, ग्रामसेवक श्रीहरी खरात हे उपस्थित होते. प्रास्ताविकात सरपंच वाळंज म्हणाले की आमचे गाव समुद्र किनारी आहे. सुपारीच्या बागा असल्याने पाऊस, अतिवारा यामुळे आपत्ती येतात नागरीकांना सतर्क होऊन काळजी घ्यार्वीें यादृष्टीने रायगड परिषदेने हे महत्वाचे शिबिर आयोजित केल्याबद्दल डॉ. किरण पाटील कार्यकारी अधिकारी यांना धन्यवाद दिले.

यावेळी पाटील म्हणाले की, गावातील एखाद्या नागरिकाचा अपघात आणि गावातील सिविल हॉस्पिटला गेलेल्या बाळंतपणा साठी रक्ताची गरज लागली तर ग्रामपंचायतच्या यंत्रणेद्वारे मदत होईल. मोबाईलचे धोके काळजी, वाडी आणी शेतात इलेक्ट्रिकल पंपाचा वापर करताना कायम पायात गम बुुटचा आपल्या सुरक्षेसाठी वापर, विंचूदंशावर प्रात्यक्षिक अपघात प्रसंगी 108 रुग्णवाहिकेचा वापर, बाळंतपणासाठी नेणे आणण्यासाठी 102 रुग्णवाहिकेची माहिती, महिला मुलींच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र पोलिसांचा112 क्रमांक वापरावा याची माहिती दिली.

Exit mobile version