। म्हसळा । वार्ताहर ।
भरवस्तीत पाच बंद घरे चोरटयानी फोडली. त्यामध्ये मोमीनपुरा येथील एकघर चोरटयानी फोडल्याचे लक्षात आले त्यामुळे आता एकूण सहा घरे फोडल्याचे तपासी अंमलदार संदीप चव्हाण यानी सांगितले. बंद घरांपैकी कन्या शाळा परिसरांतील सुनील द्वारकानाथ उमरटकर यानी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद केली आहे. यामध्ये उमरटकर यांचे घरातील देव खोलीतील 25 विविध देवपूजेचे चांदीच्या वस्तू अंदाजे किंमत रु 41 हजार, सोन्याच्या वस्तू सुमारे 15 हजार व रोख रक्कम रु12 हजारअसा सुमारे 68 हजाराचा ऐवज लंपास केला. मंगेश हेगीस्टे यांचे घरांतील रू700 किमतीच्या चांदीच्या पूजेच्या वस्तू, मोमीन पुरा येथील नवीद घरटकर यांचे घरांतून रु 2 हजार पाचशे, साने आळीतील जमाल तळकर यांचे घरांतून रु 5 हजार अशा रोख रक्कमेवर चोरट्यानी डल्ला मारला .बहुतांश घरे बंदआसल्या ने गुन्हे नोंदवि ण्यास विलंब होत आसलातरी प्रत्येक घटनेची नोंद चोरीस गेलेल्या मालासह करण्या त येणारअसल्याचे पोलीस सूत्रानी सांगितले.