महाड शहरात सहा फ्लॅट फोडले

चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही

| रायगड | खास प्रतिनिधी |

महाड शहरातील प्रभात कॉलनी परिसरातील सहा बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. या फ्लॅटमधून चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. या घटनेची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेने महाडमध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. सध्या मे महिन्याच्या सुट्ट्या सुरु असल्याने रहिवासी मोठ्या संख्येने बाहेरगावी गेले आहेत. शहरातील अनेक इमारतींमधील फ्लॅट बंद आहेत. तीच संधी साधून सोमवार आणि मंगळवारच्या रात्री प्रभात कॉलनीमधील प्रतिक गृहनिर्माण सोसायटीमधील चार, तर श्रीजी गृहनिर्माण सोसायटीतील दोन बंद फ्लॅट चोरट्यांनी फोडले. या सर्व घरांमधील कपाटे उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि किमती ऐवज शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. या फ्लॅटमालकांशी पोलिसांनी संपर्क साधला, मात्र त्यांनी फिर्याद देण्यास नकार दिल्याने पोलिसांना गुन्हा दाखल करता आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Exit mobile version