| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
मांडवी समुद्र किनार्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी 600 किलो कचरा संकलित करण्यात आला आहे. प्लास्टिक कचरा वेगळा केला असून विघटनासाठी पाठविण्यात आला आहे.
‘आपली मांडवी, स्वच्छ मांडवी’ या सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मांडवीतील स्थानिक व्यापारी, उद्योजक, रत्नागिरीकर यासाठी एकत्र आले होते.
उन्हाळी सुट्टीमुळे शहरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मांडवी समुद्रकिनारी स्थानिकांबरोबरच पर्यटकांची वर्दळ वाढत आहे. संध्याकाळी किनार्यावर फेरफटका मारणार्यांचे प्रमाण अधिक आहे. पर्यटक, फिरायला येणार्या नागरिकांकडून किनार्यावर कचरा टाकण्याचा प्रकार वाढला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊचे रॅपर्स, शेंगांची टरफले, कणसे हा कचरा किनार्यावर पसरलेला असतो. त्यामुळे सोशल मीडियावर ‘आपली मांडवी, स्वच्छ मांडवी’साठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनासाठी रत्नगिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.