भिंत कोसळून सहा जखमी

। खोपोली । प्रतिनिधी ।

उंबरे गावाजवळील एका कंपनीचा माती भराव सुरू आहे. या ठिकाणची संरक्षण भिंत कोसळली असून, काम करणारे सहा कामगार जखमी झाले झाल्याची घटना गुरूवारी (दि.5) घडली आहे. घटनास्थळी मदतकार्य करीत जखमी कामगारांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी खालापूर पोलीस ठाण्याचे उपपोलीस निरीक्षक अलोक खिसमतराव दाखल होत मातीच्या ढिगार्‍याखाली कोणी अडकले आहे का, यासाठी पोकलेन व जेसीबीने मातीचा ढिगारा उपसला. मात्र, कोणीही नसल्याचे माहिती मिळाल्यावर काम थांबविले आहे.

Exit mobile version