| भोपाळ | वृत्तसंस्था |
एकाच कुटुंबातील सहा जणांचे हत्याकांड घडवून आणल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात उघडकीस आली. मृतांत तीन महिलांचा समावेश आहे. तसेच अन्य तीन जण जखमी झाले. ही घटना लेपा भिडोसा गावात घडली. याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. गोळीबारात तीन जण जागीच ठार झाले तर तीन जणांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे मृत्यू झाला. अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. या गोळीबारातील आरोपींची ओळख पटली असून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.