| खोपोली | वार्ताहर |
गोडाऊनची संरक्षक भिंत तोडून चोरी करणारे किशोर अशोक हिलम (22), रवी काळुराम पवार (22), ज्ञानेश्वर धोंडू पवार (23), पांडुरंग बारक्या वाघमारे (55), संदीप दशरथ वाघमारे (19, सर्व रा. सावरोली आनंदवाडी, खालापूर) आणि जगलाल रामनरेश केवट (46, रा. शांती नगर, खोपोली) या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
खालापूर तालुक्यातील सावरोली गावाचे हद्दीत असलेल्या के.एम. ट्रान्सपोर्ट लॉजिस्टीक प्रा.लि.चे गोडाऊनची संरक्षक भिंत तोडून वरील चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला होता.गोडाऊन मध्ये ठेवलेले 47 हजारांचे लोखंडी गल चोरून नेले आहेत.
याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. खालापूर पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास करत सहा जणांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी या चोरीची कबुली दिली आहे. सहा जणांना अटक करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस हवालदार विजय शिंदे करीत आहेत.