| सिंधुदुर्ग | प्रतिनिधी |
जिल्ह्यातील एका जंगलात नेपाळी युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरच्या युवकाचा आंबोली घाटातील दरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मालवण जंगलातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील नांदोस गावातील जंगलमय भागात पुरुष जातीचा सडलेल्या अवस्थेतील सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. या सांगाड्यासोबत घड्याळ, बॅग, मोबाईल देखील सापडला आहे. त्यावरून पोलिसांनी, सदर सांगाडा हा कट्टा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या नेपाळी तरुणाचा असून, याबाबत त्याच्या भावाने त्या ठिकाणी सापडलेल्या साहित्याची ओळख पाटविली आहे. याप्रकरणी, मालवण पोलीस अधिक करीत आहेत.






