अलिबाग | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था -पेण व भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जन शिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून पेण येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर व कौशल्य जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रमाप्रसंगी दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी या विषयावरती मार्गदर्शन करण्यात आले. व्यक्तिमत्व विकास व कौशल्य प्रशिक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना मुख्य मार्गदर्शक डॉ. विजय कोकणे यांनी कृतज्ञतेची भावनानिर्मिती सकारात्मक करियरच घडवण्यास प्रेरक होत आहेत असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास स्मिता शिपुरकर, के.व्ही.पाटील, प्रीती संदानशिव, सायली सुभाने यांनी मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाच्या आ. रवि पाटील, प्रवीण म्हात्रे, एन.के चौधरी, विद्या पाटील, मुस्कन झटाम, सुकन्या नांदगावकर, हिमांशू भालकर उपस्थित होते.