रायगडातील स्किल हब देणार युवकांना रोजगार

जे.एस.एस. रायगडचा स्किल हबसाठी पुढाकार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
देश भरात 5000 स्किल हबच्या माध्यमातून 8 लाख युवकांना मिळणार मोफत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणार्‍या नेरळ-कर्जत येथे जन शिक्षण संस्थान रायगड व करिअर टेकनिकल ट्रेनिंग इंस्टीट्यूट नेरळ यांच्या संयुक्त विद्यमानाने स्किल हबसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. नेरळ कर्जत येथे कौशल्य विकास मंत्रालयाचे स्किल हब योजनेतील जिल्ह्यातील पहिले सेंटर सुरू करण्यात आले व असिस्टंट इलेक्ट्रिशियन व फिल्ड इंजिनीअरच्या दुसर्‍या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन गुरुवारी (दि.31) नेरळ-कर्जत येथे संपन्न झाले. सदर योजनेत देशभरात 5000 स्किल हबच्या माध्यमातून 8 लाख युवकांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, अध्यक्ष डॉ. नितीन गांधी व व्यवस्थापक मंडळ यांच्या मार्गदर्शनातून भारत सरकारच्या कौशल्य विकास योजने अंतर्गत कार्यक्रम राबवित असताना या कार्यक्रमाच्या प्रसंगी जन शिक्षण संस्थान रायगडचे संचालक विजय कोकणे, कोलारे ग्राम पंचायत सदस्य विजय हजारे, अकाउंट ऑफिसर प्रतीक्षा चव्हाण, प्रशिक्षक गणेश भोपी, विजय रणदिवे, अनिता मोरे व अविनाश डायरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व जन शिक्षण संस्थान रायगडचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पना म्हात्रे, हिमांशू भालकर व प्रशिक्षणार्थींच्या उपस्थितीत सदर उद्घाटन समारंभ कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला.

Exit mobile version