। अलिबाग । वार्ताहर ।
कौशल्य विकास व उद्योजगता मंत्रालय भारत सरकारच्या यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी जन शिक्षण संस्थान रायगड या योजनेत कार्य करत असणार्या अलिबाग तालुक्यातील राजमाता जिजाऊ शाळा आरसीएफ कॉलनी येथे सोलारवर आधारित खाद्यपदार्थ प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण सी.एस.आर, जेएनपीटी मुंबई व जन शिक्षण संस्थान रायगड यांच्या आर्थिक सहकार्यातून व्यवसाय प्रशिक्षण 11 फेब्रुवारी संपन्न झाले.
तालुक्यातील मतिमंद विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने त्यांना सातत्य पूर्ण मार्गदर्शन प्रेरणेची, प्रेमाची व सन्मान पूर्ण वागणूतिची आवश्यकता असते. त्या दृष्टिकोनातून सी.एस.आर. जे.एन.पि.टी मुंबई व जन शिक्षण संस्थान रायगड यांनी विशेष पुढाकार घेऊन व्होकल फॉर लोकल आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत विद्यार्थी व पालकांसाठी खाद्यपदार्थ प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
संस्थापक अध्यक्षा डॉ. मेधा किरीट सोमैया, डॉ. नितीन गांधी, अॅड. निला तुळपुळे, नरेन जाधव, विजय कोकणे, सिमा विषे, सुजाता देसाई, सुशील रुळेकर, प्रतिक्षा चव्हाण, सुकन्या नांदगावकर, ओंकार बोरकर, स्नेहा म्हात्रे, मतिमंद विशेष मुले व पालक यांच्या उपस्थितीत व्यवसाय प्रशिक्षण कोरोनाजन्य परिस्थितीचे सर्व नियम पाळून पार पडला. सदर 10 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये सोलर ड्रायर मशीन हाताळणी, साहित्य संकलन, बनविण्याची प्रक्रियेपासून ते पॅकिंग व विक्री व्यवस्थापन आदी सर्व विषयांवर सखोल प्रात्यक्षिक व मार्गदर्शन सुजाता देसाई यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.