स्कोडा गाडीला आग

| पाताळगंगा | प्रतिनिधी |

मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर बुधवारी (दि.10) 8.25 वाजण्याचे सुमारास स्कोडा कारचा चालक निरंजन अनिल फणसे (42) रा – सिहंगड रोड – पुणे हा ठाणेकडून ते पुणेकडे जात असताना गाडीचे इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीने पेट घेण्यास सुरुवात केली. मात्र, प्रसंग अवधान राखून त्यांनी तात्काळ वहान थांबवून त्याने त्यांची कार रस्त्याचे बाजूला घेतली व तात्काळ व आय आर बी कंट्रोलला संपर्क करून मदत मागितली. यावेळी आय आर बी फायर ब्रिगेड, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा टोल प्लाजा – खालापूर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Exit mobile version