शेकाप मध्यवर्ती समितीची गडचिरोलीत बैठक

। गडचिरोली । प्रतिनिधी ।
शेकाप मध्यवर्ती समितीची दोन दिवसीय बैठक गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने सरचिटणीस आ.जयंत पाटील हे शुक्रवारी (दि.25) गडचिरोलीत दाखल होत आहेत.

गडचिरोलीत बँक ऑफ इंडियासमोरील हॉटेल लेक व्ह्यू येथे 26, 27 नोव्हेंबरला मध्यवर्ती समितीची बैठक होणार आहे. आ.जयंत पाटील यांच्यासह आ.बाळाराम पाटील, श्यामसुंदर शिंदे, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा आशा शिंदे, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आ.संपतबापू पाटील, धैर्यशील पाटील, पंडित पाटील, प्रा.एस.व्ही.जाधव, कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजेंद्र कोरडे यांच्यासह राज्यभरातील दीडशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

या दौर्‍यात आ.जयंत पाटील हे जिल्ह्यातील विविध संस्थांना भेटी देऊन चर्चा करणार असल्याची माहिती माहिती जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिली.

Exit mobile version