। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी तर्फे शेकापचे आ.बाळाराम पाटील (Balaram Patil) हे बुधवारी (दि.11) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी आघाडीचे राज्यातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बुधवारी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कोकण आयुक्त कार्यालय कोकण भवन सीबीडी, बेलापूर येथे ते अर्ज दाखल करणार आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) , विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील (Bhai Jayant Patil), आ.जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), खा.सुनिल तटकरे (Sunil Tatkare), माजी मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai), खा.विनायक राऊत (Vinayak Raut), आ. भाई जगताप (Bhai Jagtap), आ.रईस शेख (Rais Shaikh), महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत. दरम्यान भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना पक्ष युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मंगळवारी (दि.10) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.