शेकापचे ज्येष्ठ नेते मोतीराम पाटील यांचे निधन

। मुरुड । प्रतिनिधी ।
शेकापचे ज्येष्ठ नेते मोतीराम चाया पाटील यांचे 8 मार्च रोजी निधन झाले. एकदरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, हनुमान मच्छीमार सहकारी सोसायटी सचीव ते चेअरमन, सतरा वर्षे लोकन्यायालय सदस्य पद, कोळी समाज मुरुड, म्हसळा, तळा व श्रीवर्धन तालुक्याचे लाडके व्यक्तिमत्त्व असा त्यांचा कार्यभार होता.
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ आपला आगळावेगळा ठसा उमटवणारे मोतीराम पाटील यांनी सुरुवातीच्या काळात काँग्रेस पक्षात तर सन 2008 पासून शेतकरी कामगार पक्षाचे अखेर पर्यंत निष्ठेने काम पहिले. एकदरा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Exit mobile version