वर्धापन दिनाच्या नियोजनाबाबत माणगावमध्ये शेकापची सभा

शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांची माहिती
। माणगाव । सलीम शेख ।
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाची रायगड जिल्ह्यात सर्वत्र जय्यत तयारी सुरु आहे. वर्धापन दिनानिमित्त माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाची सभा शनिवारी (दि.16) दुपारी 1 वाजता कुणबी भवन माणगाव येथे आयोजित केली असल्याची माहिती शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी दिली.

या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, आ.बाळाराम पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या अ‍ॅड. नीलिमा पाटील, आरडीसीसी बँकेचे व्हा. चेअरमन सुरेश खैरे, जे.बी. सावंत एजुकेशन सोसायटीचे चेअरमन नानासाहेब सावंत, आरडीसीसी बँकेचे संचालक अस्लम राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले. या सभेला तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेकापच्यावतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version